दुरांतो एक्स्प्रेसला सिंकदराबाद येथे अपघात, २ ठार तर ७ जखमी

दुरांतो एक्स्प्रेसला सिंकदराबाद येथे अपघात झाला. रेल्वेचे ९ डब्बे रुळावरून घसरल्याने दोन प्रवासी ठार तर ७ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा अपघात रात्री २.२० ते २.१५ वाजण्याच्या दरम्यान झाला.

PTI | Updated: Sep 12, 2015, 08:36 AM IST
दुरांतो एक्स्प्रेसला सिंकदराबाद येथे अपघात, २ ठार तर ७ जखमी title=
छाया - एएनआय

कलबुर्गी : दुरांतो एक्स्प्रेसला सिंकदराबाद येथे अपघात झाला. रेल्वेचे ९ डब्बे रुळावरून घसरल्याने दोन प्रवासी ठार तर ७ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा अपघात रात्री २.२० ते २.१५ वाजण्याच्या दरम्यान झाला. 

दुरांतो एक्स्प्रेस हैदराबाद ते पुणे येथे होती. कलबुर्गी येथे या गाडीला अपघात झाला. कलबुर्गीपासून २० किमी अंतरावरील मर्तुर येथे ही घटना घडली. दरम्यान, या घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिलेत. याबाबत त्यांनी ट्विट केलेय.

रेल्वे अपघातील जखमींना महाराष्ट्रातील सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.