ई फायलिंग : बँक खाते आधारित प्रमाणीकरण सुविधा

आयकर विभागाने (इन्कम टॅक्स) करदात्यांसाठी आता ई-आयटीआर दाखल करण्यासाठी बँक खाते आधारित प्रमाणीकरण सुविधा सुरु केली आहे. ही सुविधा शुक्रवारपासून सुरु झालेय.

Updated: May 7, 2016, 01:12 PM IST
ई फायलिंग : बँक खाते आधारित प्रमाणीकरण सुविधा title=

नवी दिल्ली : आयकर विभागाने (इन्कम टॅक्स) करदात्यांसाठी आता ई-आयटीआर दाखल करण्यासाठी बँक खाते आधारित प्रमाणीकरण सुविधा सुरु केली आहे. ही सुविधा शुक्रवारपासून सुरु झालेय.

आयकर विभागाने वार्षिक आयटी रिटर्न भरण्यासाठी कागजविरहित प्रणालीला (पेपर्सलेस) प्रोत्साहन देण्यसाठी ही नवी सुविधा उपलब्ध करुन दिलेय.

आयकर विभागाने सार्वजनिक सूचना करताना सांगितलेय, आता इलेक्ट्रोनिक व्हेरिफिकेशन कोड (ईव्हीसी) ई फायलिंग वेबसाईटवर आपल्या (करदाते) बॅंक खात्याच्या आधीच्या प्रमाणीकरणाच्या माध्यमातून होऊ शकते. ही सुविधा लागू करण्याबाबत पंजाब नॅशनल बॅंकने (पीएनबी) पहिले पाऊल उचलले आहे.

आता अन्य बॅंक ही सुविधा देण्याबाबत विचार करतील, अशी शक्यता आहे. आयकर विभागाच्या आणखी सुविधा या आता वेबसाईटवर उपलब्ध होणार आहेत.