नवी दिल्ली : काळापैसा बाळगणाऱ्यांवर ऑपरेशन सुरु करत मोदी सरकारने धडक कारवाई सुरु केली आहे. आज देशभरात ३०० हून अधिक कंपन्यांवर ईडीने छापे टाकले आहेत.
ईडीची टीम एंट्री आपरेटरांवर कार्रवाई करत आहे. सोबतच ३०० कंपन्यांवर देखील कारवाई केली आहे. या दोघांच्या मार्फत काळापैसा पांढरा करण्याचं काम होतं. शेकडो ईडीचे अधिकारी देशभरात एकत्र ही धडक कारवाई करत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार ईडीची टीम दिल्ली, चंडीगढ, पटना, रांची, अहमदाबाद, ओडिसा, बंगळुरु, चेन्नई या सारख्या शहरांमध्ये ईडीची कारवाई सुरु आहे. छापे टाकत अनेक महत्त्वाचे कागदपत्र ताब्यात घेण्यात आले आहेत. अनेकांचे घोटाळे यामधून बाहेर येण्याची शक्यता आहे.