नवी दिल्ली : महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबत भारतीय जनता पक्ष लवकरच निर्णय घेऊ शकतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी खडसेंच्या एमआयडीसी आणि दाऊद प्रकरणांवरचा अहवाल मागितलाय.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला जात आहेत. स्कील डेव्हलपमेंट हा भेटीचा विषय असल्याचं सांगण्यात येत असलं तरी मुख्य मुद्दा हा राज्यातल्या राजकीय घडामोडी आणि खडसे हाच असणार आहे.
फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संध्याकाळी ६.३० वाजता भेट घेणार आहेत. त्यानंतर शहा यांच्याकडे वस्तुस्थिती मांडली जाईल आणि आजच खडसेंचं भवितव्य निश्चित होईल, असं समजतंय. दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि भाजप खासदार सत्यपाल सिंग यांनी खडसेंबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट केले आहे.