इरोडः फेसबूकवर अपमानजनक पोस्ट केल्याबद्दल ३२ वर्षीय व्यक्तीची चाकूचे वार करून हत्या करण्यात आली. ज्या व्यक्तीबद्दल अपमानजनक पोस्ट टाकली होती त्यानेच रागाच्या भरात पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीची हत्या केली.
डी कार्तिक (३०) या व्यक्तीने फेसबूकवर पोस्ट करणारा षण्मुगम यांची हत्या केली आहे. यांच कारण कार्तिकला फेसबूक पोस्टवर षण्मुगमने 'दलाल' असं म्हटले होते. मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फेसबूक पोस्टमध्ये एका महिलेचा फोटो टाकण्यात आला होता आणि कार्तिकचा मोबाईल क्रमांकही देण्यात आला होता. यामुळे व्यावसायिक सेक्स वर्करच्या मागणीसंदर्भात फोन येऊ लागले.
फेसबूकवर पोस्ट टाकणारा व्यक्ती त्याचा मित्र षण्मुगम असल्याचा कार्तिकला संशय आला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. वादावेळी षण्मुगमने हा आरोप फेटाळा आणि सांगितले की अशा प्रकारे वाईट पोस्ट टाकण्यापेक्षा त्याकडे इतर चांगल्या करण्यासारख्या गोष्टी आहेत. हे ऐकल्यावर कार्तिकने षण्मुगमवर चाकूने वार केला. षण्मुगमला एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्या ठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.