आपल्यातल्या बालकाला नेहमी जिवंत ठेवा, मोदींचे विद्यार्थ्यांना 'लाईव्ह' धडे

 शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत...

Updated: Sep 5, 2014, 11:54 PM IST
आपल्यातल्या बालकाला नेहमी जिवंत ठेवा, मोदींचे विद्यार्थ्यांना 'लाईव्ह' धडे title=

नवी दिल्ली :  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातल्या विद्यार्थ्यांना आज शिक्षक दिनी संदेश दिला. आपल्याला घडवण्यात शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचं ते म्हणाले. 

टीव्ही आणि कॉम्प्युटरपेक्षाही जग मोठं आहे... त्यामुळे आपल्या आसपास बघून शिका, असं मोदी यांनी यावेळी म्हटलंय. आज विद्यार्थ्यांना डॉक्टर-इंजिनियर बनायचं असतं... त्यांना शिक्षक बनावं असं का वाटत नाही? असा सवालही पंतप्रधानांनी केला. शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांचा मुद्दा त्यांनी यावेळी प्रामुख्यानं मांडला. जपानमध्ये शाळेला दिलेल्या भेटीची आठवण सांगताना तिथले विद्यार्थी-शिक्षक स्वतः शाळेची स्वच्छता राखतात, असं मोदी म्हणाले. पाठ्यपुस्तकां व्यतिरिक्त अवांतर वाचनाचाही त्यांनी आग्रह धरला. 

यावेळी, काही विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांसमोर भाषण केलं. यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी सरळ-सरळ पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याची संधीही अनुभवली. यातील, काही विद्यार्थी हॉलमध्येच उपस्थित होते... तर भारतातील विविध ठिकाणांहून अनेक विद्यार्थ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही मोदींनी प्रश्न विचारले. ​

 
 
काय म्हणतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी
शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद
| मोदी सरांचे विद्यार्थ्यांना धडे
| मोदींच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची भाषणं
| मनुष्यबळ विकास मंत्र स्मृती इराणींची उपस्थिती
| देशातील भावी पिढिशी बोलण्याची संधी
| एकेकाळी गावात सगळ्यात जास्त मान शिक्षकाला दिला जायचा
| शिक्षक-विद्यार्थ्यांचं नातं जीवन बदलून टाकतं
| शिक्षक दिनाचा विसर पडत चाललाय
| विद्यार्थी शिक्षक का बनू इच्छित नाहीत?
| शाळांमध्ये मुलींसाठी टॉयलेट का नाहीत?
| मला घडवण्यात शिक्षकांचा मोठा वाटा - नरेंद्र मोदी
| अभ्यास, टीव्ही, क्म्प्युटर हेच विद्यार्थ्यांचं जीवन नाही
| प्रत्येक प्रश्नाचे उत्तर - गुगलगुरू
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं देताना


पाहा, मोदींना मुलांनी काय काय प्रश्न विचारले आणि मोदींनी त्यांची कशी उत्तरं दिली... 
| अनुभव सगळ्यात मोठा गुरु असं म्हटलं जातं पण, योग्य शिक्षण हवंच
| तुमच्या शिक्षण, संस्कारांवर तुमचा अनुभव कसा वापरावा हे कळतं
| म्हणूनच माझ्या जीवनात अनुभवासोबत शिक्षण, शिक्षक आणि संस्कारांचाही मोठा वाटा आहे
| शाळेत असताना मॉनिटरची निवडणूकही कधी लढलो नव्हतो...
| मला काय बनायचंय ऐवजी मला काय करायचंय, याची स्वप्न पाहा
| करता, करता काहीतरी बना, नाही बनलात तरी चालेल, करण्याचा आनंदच मोठा असतो
| विद्यार्थ्यांशी संवाद साधून काय मिळणार? - एका विद्यार्थ्यांचा प्रश्न
| कोणता लाभ मिळावा यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद नाही
| आज पहिल्यांदाच टीव्ही बालमित्रांनी व्यापून टाकलाय - नरेंद्र मोदी
| विद्यार्थ्यांना पाहिल्यावर, ऐकल्यावर माझीही बॅटरी चार्ज होते - मोदी
| मोदी खाजगी जीवनात कसे आहेत? - एका विद्यार्थ्यांचा प्रश्न
| मी स्वत: हे ठरवू शकत नाही - मोदी
| मी हेडमास्टर नाही तर टास्क मास्टर - मोदी
| मी कामही करतो आणि करूनही घेतो
| मी पंतप्रधान कसा बनुू शकतो? - एका विद्यार्थ्यांचा प्रश्न
| 2024 च्या निवडणुकीची तयारी करा... तेव्हापर्यंत मला धोका नाही - मोदींचा मिश्किलपणा
| देशातील जनतेची मनं जिंका आणि इथं पोहचा - मोदी
| तुमच्या शपथविधीसाठी मलाही बोलवा - मोदी
| विद्यार्थीदशेत मीही खूप मस्ती केलीय - नरेंद्र मोदी
| शहनाई वाजविणाऱ्या चिंचा दाखवायचो...
| लग्नात घुसून स्त्रिया-पुरुषांच्या कपड्यांना पकडून स्टेपलर लावायचो...
| मोदींनी सांगितल्या खोडकर आठवणी
| दंतेवाडीसारख्या दर्गम परिसरात उच्च शिक्षणाची सोय नाही, यासाठी काय कराल - एक प्रश्न
| मुलींच्या शिक्षणाला खूप महत्त्व द्यायला हवं, हे खरं आहे
| देशाच्या विकासात 50 टक्के मुलींचा वाटा
| मुलींनी शाळा सोडू नये, त्यांनी उच्च शिक्षण घ्यावं याचा प्रयत्न
| बस्तरसारख्या ठिकाणाहून एक मुलगी यावर प्रश्न विचारतेय, देशाला जागविण्याची या प्रश्नात ताकद
| विद्यार्थ्यांची स्वच्छतेशी तडजोड नको
| वीज वाचवा... घरी आई-वडिलांशी चर्चा करा, हीदेखील देशसेवाच
| देशसेवेसाठी खूप मोठ्या-मोठ्या गोष्टीच करण्याची गरज नाही
| पर्यावरणासाठी आपण काय करू शकतो? - एका विद्यार्थ्यांचा प्रश्न
| पर्यावरण नाही तर आपण बदललोय - मोदी
| आपण बदललो, तर आपण बिघडलेलं पर्यावरणही बदलू शकतो - मोदी
| मनुष्याचा प्रकृतीशी संघर्ष नको, तर प्रेम करा - मोदी
| नागपूरच्या महापौरांनी वीज वाचविण्यासाठी त्यांनी केलेला प्रयोग सांगितला
| पौर्णिमेच्या रात्री लाईट बंद करा
| चांदण्या रात्री सुईत धाग ओवण्याची स्पर्धा घ्या
| वीज तयार करणं महाग आहे, पण वाचवणं खूप सोप आहे
| तणाव कसा हॅन्डल करता - एका विद्यार्थ्यांचा प्रश्न
| राजकारण हे काम मानत नाही, सेवा आहे
| सव्वाशे कोटी जनता हे माझं कुटुंब
| त्यांची सेवा करताना थकवा जाणवत नाही
| 'डिजीटल इंडिया'चं स्वप्न पाहतोय - मोदी
| किती शाळेत विद्यार्थ्यांपर्यंत माझा ई-मेल पोहचतोय, हे पाहतोय
| मुलींना शिक्षणासाठी घरापासून फार दूर जाण्याची गरज लागणार नाही, याचा प्रयत्न सुरू
| शाळेत 'स्किल्ड डेव्हलपमेंट'वर भर कसा देणार - एका विद्यार्थ्यांचा प्रश्न
| डिग्रीसोबतच प्रत्येक मुलाला स्किल्ड डेव्हलपमेंटची संधी मिळायला हवी
| आपल्यातल्या 'लहान मुलांना' नेहमी जिवंत ठेवा - नरेंद्र मोदी

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.