नवी दिल्ली/नोएडा: 500 आणि 2000 च्या नवीन नोटा चलनात येत नाहीत तोपर्यंत नकली नोटाही बाजारात आल्यात. दानकोर येथील पोस्ट ऑफिसात चक्क 11 हजार रुपयांच्या नकली नोटा जमा झाल्या आहेत.
त्यानंतर पोस्ट ऑफिसने 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा स्वीकारण्यास बंदी घातली आहे. पोस्टमास्तर एमएस डागर बुलंदशहरातील मुख्य पोस्ट ऑफिसात पैसे जमा करत असताना त्यांना नकली नोटांची माहिती झाली.
पोस्टमास्तरांनी सांगितले की, जोपर्यंत आम्हाला नकली नोटा ओळखण्याची मशीन मिळत नाही तोपर्यंत आम्ही पोस्ट ऑफिसात 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा स्विकारणार नाही.