धक्कादायकः पोलीस अधिकाऱ्याने शेतकऱ्याला मूत्र पाजले

उत्तर प्रदेशातील ललितपूर येथील एका शेतकऱ्याला पोलिस अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. शेतकऱ्याला सुरूवातीला झोडपले आणि नंतर जबरदस्तीने मूत्र पाजल्याची तक्रार दाखल केली आहे. 

Updated: Aug 12, 2014, 06:51 PM IST
धक्कादायकः पोलीस अधिकाऱ्याने शेतकऱ्याला मूत्र पाजले title=

झाशी : उत्तर प्रदेशातील ललितपूर येथील एका शेतकऱ्याला पोलिस अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. शेतकऱ्याला सुरूवातीला झोडपले आणि नंतर जबरदस्तीने मूत्र पाजल्याची तक्रार दाखल केली आहे. 

तक्रारीनुसार कांसीरामजवळ मेहरोनी ठाण्याजवळ भौरांडा गावात काही बिघे जमीन आहे. त्या जमीनीशी संबधी गाववाल्यांमध्ये वाद सुरू आहे. या संदर्भात कांशीराम यांनी तक्रार दाखल केली. 

शनिवारी मेहरोनी ठाण्याचा इंचार्ज विजय सिंहने कांशीरामला बोलावले आणि जमिनीवर शेती न करायचा सल्ला दिला. कांशीराम याने आरोप लावला की जेव्हा त्यांनी पोलिसाचा म्हणणे ऐकण्यास नकार दिला तेव्हा पोलिस शिपायांनी मला विचित्र पद्धतीने मारले आणि पोलीस ठाण्यात मूत्र पाजले. 

कांशीरामने या घटनाची तक्रार जिल्हा एसपीकडे केली. एसपी विजय यादव यांनी सांगितले की, अशी काही घटना घडली असेल तर ती सहन केली जाणार नाही. मी संपूर्ण चौकशीचे आदेश दिले आहे. अधिकारी दोषी आढळल्यास त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल. 

दरम्यान, अधिकाऱ्याला शिक्षा झाली नाही तर आत्महत्या करण्याचा इशारा कांशीरामने दिला आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.