गुप्तधनासाठी बापानं दिला चिमुकलीचा बळी

कर्नाटकातील फिरोजाबाद किल्ल्यातील गुप्तधन मिळावं यासाठी एका पित्याने आपल्या १५ महिन्यांच्या चिमुकलीचा बळी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. अंधश्रद्धेची बळी ठरलेल्या चिमुकलीच्या वडिलांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 24, 2014, 11:57 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, गुलबर्गा कर्नाटकातील फिरोजाबाद किल्ल्यातील गुप्तधन मिळावं यासाठी एका पित्याने आपल्या १५ महिन्यांच्या चिमुकलीचा बळी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. अंधश्रद्धेची बळी ठरलेल्या चिमुकलीच्या वडिलांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. मुलीचे वडील मूळचे बिहारचे असून, फिरोजाबाद मशिदीत पेशे इमाम आहेत. प्रारंभी मुलीचे वडील निष्पाप वाटत होते. परंतु चौकशीअंती या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचं दिसून आलं, असं पोलिसांनी सांगितलं. मुलगी बेपत्ता होण्याची तक्रार २२ मे रोजी करण्यात आली होती. परंतु २६ मे रोजी तिच्या घराजवळ अवयव कापलेला मृतदेह आढळून आला होता. दरम्यान, आरोपींपैकी एकाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक आणि दोन पोलीस उपनिरीक्षकांसह पाच जणांना निलंबित करण्यात आलंय. पोलीस कोठडी मृत्यू प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आली आहे. मृत आरोपीच्या अंगावर कुठल्याही प्रकाराची जखम आढळून आली नाही. उत्तरीय तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे, असं अधिकार्यांयनी सांगितलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. * झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.