बंगळूरू : देशातील आठ मुख्य मार्गाना एअर जेट्स आणि दुसऱ्या लँडीगसाठी सोईचे होईल असे तयार करण्यात यावे अशी सूचना भारतीय हवाई दलाने राष्ट्रीय महामा्र्ग प्राधिकरणाला दिले.
जर असे शक्य झाले तर पंजाब, गुजरात, राजस्थान या राज्यामध्ये आणीबाणीच्या काळामध्ये या राष्ट्रीय महामार्गांवर एअर फोर्सची विमानेही उतरू शकतील. या प्रकारच्या हायवेला स्ट्रिप हायवे म्हणतात.
जुलै महिन्यामध्ये भारतीय हवाई दलाने यमुना एक्स्प्रेस हायवेवर मिराज २००० हे लढाऊ विमान उतरविले होते. भारतात ही पहिलीच वेळ होती जेव्हा असे परिक्षण करण्यात आले होते.
युद्धच्या काळामध्ये अशा प्रकारच्या स्ट्रीप हायवेवर लढाऊ विमाने उतरण्यास परवानगी दिली जाते. दुसऱ्या महायुध्दावेळी अशा प्रकारचे स्ट्रिप हायवे पहिल्यांदाच बनवण्यात आले होते आणि या हायवेचा उपयोग लढाऊ विमानाच्या उतरवण्यासाठी केला गेला होता.
स्ट्रिप हायवे हे २ ते ३ किलोमीटर लांबीचे असतात. यांना तयार करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या क्राँकीटचा उपयोग केला जातो.
पाकिस्तानात २००० आणि २०१० या वर्षी पेशावर ते इस्लामाबाद आणि इस्लामाबाद ते लाहोर या दोन मार्गावर एफ - ७ हे लढाऊ विमानचे परीक्षण केले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.