नवी दिल्ली : देशातील काळ्या धनावर अंकुश ठेवण्यासाठी एक नव विधेयक सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात आणण्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत केलीय.
अर्थसंकल्प 2015-16 संसदेत सादर करताना, हेच विधेयक आपल्या कर प्रस्तावांचा पहिला आणि प्रमुख आधार असेल असंही म्हटलंय.
पाहुयात... यावेळी त्यांनी काय काय म्हटलं...
काळ्या धनावर अंकुश ठेवण्यासाठी धनाच्या बेनामी हस्तांतरणावर एका नव्या कायद्याची जेटलींनी घोषणा केलीय.
काळ्या धनावर सापडलेल्या धनाच्या 300 टक्के दंड आकारला जाईल.
करचोरी प्रकरणं सोडवण्यासाठी कुठल्याही सेटलमेन्ट आयोगात जाता येणार नाही.
काळं धन लपवल्याचं आढळलं तर 10 वर्षांपर्यंतच्या कैदेच्या शिक्षेची तरतूद
परदेशातील संपत्तीचं विवरण न देणाऱ्यांना कैदेसहित दंडही भरावा लागेल.
या गुन्ह्यांना मोठा अपराध मानलं जाईल आणि अशा गुन्ह्यांसाठी मिळकत आणि संपत्तीच्या सध्याच्या दराहून 300 टक्के अधिक दंड लावला जाईल.
मिळकतीची माहिती देताना अर्धवट माहिती दाखल करणं किंवा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल न करणं अशा गु्न्ह्यांसाठी 7 वर्षांच्या कडक शिक्षेची तरतूद
नव्या कायद्यान्वये एक लाखांहून अधिक कोणत्याही खरेदी आणि विक्रीसाठी पॅन क्रमांक देणं आवश्यक असेल.
20 हजारांहून अधिक रोख पैशांचं हस्तांतरणावर बंदी घालण्यात येणार
बँका, वित्तीय संस्था आणि व्यक्तींविरोधात अशा प्रकारची कारवाई करता येऊ शकते.
परकीय चलन व्यवस्थापन कायदा 1999 (फेमा) तसंच धन शोध कायदा 2002मध्ये बदल करण्याचाही प्रस्तावांचा
अवैध रुपात विदेशांत जमा केलेल्या काळ्या धनाचा शोध सुरूच ठेवण्यासाठी आणि हे काळ धन देशात परत आणण्यासाठी सरकार प्रतिबद्ध
गेल्या 9 महिन्यांत या समस्येच्या समाधानासाठी अनेक उपाय योजले गेले.
या प्रकरणांत स्वीस अधिकाऱ्यांशी बोलणी झाल्यानंतर एक प्रमुख सकारात्मक परिणामही समोर आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.