आर्थिक वर्ष आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात बदल व्हायची शक्यता

आगामी वर्षापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन जानेवारीत होण्याची शक्यता आहे.

Updated: Oct 13, 2016, 06:40 PM IST
आर्थिक वर्ष आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात बदल व्हायची शक्यता  title=

नवी दिल्ली : आगामी वर्षापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन जानेवारीत होण्याची शक्यता आहे. तसंच अर्थसंकल्पही जानेवारीतच सादर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आर्थिक वर्षाचा कालावधी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असा होणार असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे कॅलेंडर वर्षानुसारच आर्थिक वर्ष होणार असल्याची शक्यता आहे.

मोदी सरकारनं यापूर्वीच केंद्रीय अर्थसंकल्पातच रेल्वे अर्थसंकल्पाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 2017 पासून स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पही सादर होणार नाही.