देश कायद्याने चालतो, ज्याला मान्य नाही त्यांनी पाकिस्तानात जा - साक्षी महाराज

तीन तलाकवर आता वादाला सुरुवात झाली आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने प्रेस कॉन्फ्रेंस करत जाहीर केलं की, ते तीन तलाक आणि यूनिफॉर्म सिविल कोडच्या मुद्द्यावर सरकारचा विरोध करणार आहेत. तर भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी देखील देश हा कायद्याने चालेल फतव्याने नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Oct 13, 2016, 06:32 PM IST
देश कायद्याने चालतो, ज्याला मान्य नाही त्यांनी पाकिस्तानात जा - साक्षी महाराज title=

नवी दिल्ली : तीन तलाकवर आता वादाला सुरुवात झाली आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने प्रेस कॉन्फ्रेंस करत जाहीर केलं की, ते तीन तलाक आणि यूनिफॉर्म सिविल कोडच्या मुद्द्यावर सरकारचा विरोध करणार आहेत. तर भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी देखील देश हा कायद्याने चालेल फतव्याने नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
 
बोर्डाने म्हटलं की, केंद्र सरकार त्यांचं अपयश लपवण्यासाठी असं करत आहे. तीन घटस्फोटांवर ज्याप्रकारे लॉ कमीशनकडे हे संपवण्यासाठी लोकांकडून प्रतिक्रिया मागवण्यात आल्या. त चुकीचं आहे आणि याचा विरोध करणार असल्याचं बोर्डाने म्हटलंय.

भाजप खासदार साक्षी महाराजांनी तीन घटस्फोटांवर सरकारच्या निर्णयाला योग्य असल्याचं म्हटलं आहे. ज्यांना कायदे मान्य नसतील त्यांनी पाकिस्तानात जावं. त्यामुळे आता देशात यावरुन नवीन वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत.