दीप्ती सारना अपहरण प्रकरणी ५ अटकेत

 स्नॅपडील कर्मचारी दीप्ती सारनाच्या अपहरण प्रकरणी पोलिसांननी पाच आरोपींना अटक केली आहे. या संदर्भात पोलीस आज संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करू शकतात. 

Updated: Feb 15, 2016, 10:32 AM IST
दीप्ती सारना अपहरण प्रकरणी ५ अटकेत  title=

नवी दिल्ली :  स्नॅपडील कर्मचारी दीप्ती सारनाच्या अपहरण प्रकरणी पोलिसांननी पाच आरोपींना अटक केली आहे. या संदर्भात पोलीस आज संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करू शकतात. 

पोलिसांनी दावा केला की त्यांना अत्यंत महत्वाचे पुरावे मिळाले आहेत. तसेच दीप्तीच्या अपहरणात दीप्तीच्या घरातीलच व्यक्तींचा हात असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण फिल्मी स्टाइलमध्ये संपूर्ण कट रचण्यात आला. हे अपहरण एकतर्फी प्रेमातून करण्यात आले होते. रविवारी पोलिसानी दीप्तीला घटनास्थळी नेले आणि संपूर्ण घटना जाणून घेतली.