लक्ष द्या: दुसऱ्या बँकेच्या ATMमधून दोन वेळा पैसे काढता येणार

सर्व नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता शहरी भागात दुसऱ्या बँकेच्या ATMमधून महिन्याला फक्त दोन वेळा फुकटात पैसे काढता येणार आहेत. पहिले महिन्याला पाच वेळा फ्रीमध्ये कोणत्याही बँकेच्या एटीएमधून पैसे काढता येत होते. सहाव्या व्यवहारापासून (ट्रान्झॅक्शन) ग्राहकाला सेवा शुल्क द्यावे लागत होते.

PTI | Updated: Aug 2, 2014, 05:45 PM IST
लक्ष द्या: दुसऱ्या बँकेच्या ATMमधून दोन वेळा पैसे काढता येणार title=

मुंबई: सर्व नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता शहरी भागात दुसऱ्या बँकेच्या ATMमधून महिन्याला फक्त दोन वेळा फुकटात पैसे काढता येणार आहेत. पहिले महिन्याला पाच वेळा फ्रीमध्ये कोणत्याही बँकेच्या एटीएमधून पैसे काढता येत होते. सहाव्या व्यवहारापासून (ट्रान्झॅक्शन) ग्राहकाला सेवा शुल्क द्यावे लागत होते.

आता मात्र एका महिन्यात तिसऱ्यांदा दुसऱ्या बँकेच्या ATMचा वापर केल्यास ग्राहकाला २० रुपये सेवा शुल्क (सर्व्हिस चार्ज) द्यावा लागणार आहे. तर ग्रामीण भागात महिन्याला पाच वेळा दुसऱ्या बँकेच्या ATMमधून फुकटात पैसे काढता येणार आहेत. रिझर्व्ह बँकेनं हे निर्देश दिले आहेत. 

आर्थिक व्यवहारांमध्ये आणखी पारदर्शकता यावी तसंच व्यवहार सुरक्षित राहावेत म्हणून दुसऱ्या बँकेच्या ATM वापरावर बंधन आणणं आवश्यक होतं. रिझर्व्ह बँकेनं मागण्या मान्य केल्यामुळं ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी एटीएमचं जाळं विस्तृत करण्याबाबत विचार करता येईल, असं अनेक बँकांच्या व्यवस्थापनानं सांगितलंय.

बँकांमधली गर्दी कमी व्हावी या उद्देशानं २००९ मध्ये कोणत्याही बँकेच्या ATMमधून फुकटात पैसे काढण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेनं दिली होती. पण अनेक बँकांनी विरोध केल्यामुळं रिझर्व्ह बँकेनं दुसऱ्या बँकेच्या ATM च्या वापरावर बंधनं आणली होती.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.