अन्नसुरक्षा अध्यादेश लोकसभेत

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचा महत्त्वाकांशी असलेला अन्नसुरक्षा अध्यादेश लोकसभेत मांडण्यात आलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 6, 2013, 08:48 AM IST

www.24tass.com , झी मीडिया, नवी दिल्ली
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचा महत्त्वाकांशी असलेला अन्नसुरक्षा अध्यादेश लोकसभेत मांडण्यात आलाय. या अध्यादेशावर उद्या चर्चा होण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षानं अन्नसुरक्षा अध्यादेशच्या सद्य स्वरुपाला समर्थन देण्यास नकार दिलाय. तर दुसरीकडे भाजपनं आगामी निवडणुका लक्षात घेता अध्यादेशाला काँग्रेससमोरची चिंता म्हटलंय.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला समाजवादी पक्षाचे नेते नरेश अग्रवाल यांनी सद्य स्वरुपात हे विधेयक त्यांचा पक्ष स्विकारणार नाही, हे स्पष्ट केलं होतं. विधेयकात आणखी सुधारणा आवश्यक असून गरज पडल्यास त्याविरोधात मतदान करणार असल्याचंही ते म्हणालेत. समाजवादी पक्षाचा केंद्र सरकारला बाहेरुन पाठिंबा आहे. लोकसभेत पक्षाचे २२ खासदार असून अन्नसुरक्षा विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांचं समर्थन आवश्यक आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.