माकडाच्या अंत्यविधीला 200 जणांचं मुंडण, 6 हजार लोक उपस्थित

गावाच्या हद्दीत माकडाचा मृत्यू झाला आणि त्यामुळं गावावर अरिष्ट ओढवेल आणि ते ओढवू नये म्हणून मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील दकाचया गावात या माकडावर हिंदू रिती रिवाजाप्रमाणं अंत्यसंस्कार करण्यात आले. सुमारे 200 तरुणांनी मुंडणही केलं. दीड लाख रुपये खचरून या माकडाच्या तेरवीचं जेवणही करण्यात आलं.

Updated: Sep 18, 2014, 01:53 PM IST
माकडाच्या अंत्यविधीला 200 जणांचं मुंडण, 6 हजार लोक उपस्थित title=

इंदूर: गावाच्या हद्दीत माकडाचा मृत्यू झाला आणि त्यामुळं गावावर अरिष्ट ओढवेल आणि ते ओढवू नये म्हणून मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील दकाचया गावात या माकडावर हिंदू रिती रिवाजाप्रमाणं अंत्यसंस्कार करण्यात आले. सुमारे 200 तरुणांनी मुंडणही केलं. दीड लाख रुपये खचरून या माकडाच्या तेरवीचं जेवणही करण्यात आलं.

इंदूरपासून जवळच असलेल्या दकाचया गावात 2 सप्टेंबरला माकड आणि माकडीण गावात आले. काही कुत्र्यांनी या माकडांना खिजवलं. याचदरम्यान माकड पाण्यानं भरलेल्या मोठय़ा खड्डय़ात पडलं आणि तिथं बुडून त्याचा मृत्यू झाला.  

वानर हा भगवान हनुमानाचा अवतार मानला जातो. त्याचा मृत्यू अशुभ मानला जातो. त्याचमुळं गावकऱ्यांनी या माकडावर विधिवत अंत्यसंस्कार करायचं ठरवलं.  

3 सप्टेंबरला माकडाला पाण्यातून बाहेर काढण्यात आल. केवळ गावातीलच नाही तर आजूबाजूच्या खेड्यातीलही सहा हजार लोकांच्या उपस्थितीत या माकडावर हिंदू रिती रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. एवढंच नव्हे तर चक्क तरुणांनी मुंडण केलं. यानंतर गाववर्गणीतून गत रविवारी तेरवीचा कार्यक्रमही पार पडला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.