पॅरिस : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. फ्रान्समधील एका वृत्तपत्राने त्यांची मुलाखत छापण्यात नकार दिला आहे. 'द मॉन्द' असे त्या वृत्तपत्राचे नाव आहे.
वृत्तपत्राला मुलाखत देण्यासाठी मोदींनी काही अटी ठेवल्या होत्या. मुलाखतीत विचारले जाणारे सर्व प्रश्न आधी लिहून द्यावेत. त्या प्रश्नांची उत्तरे मी लेखी देईन अशी अट मोदींनी ठेवली होती. ही अट 'द मॉन्द' वृत्तपत्राला मान्य न झाल्याने त्यांनी मोदींची मुलाखत घेण्यात नकार दिला.
'द मॉन्द' वृत्तपत्राने नकारासोबतच मोदीनी ठेवलेली अट मान्य नसल्याने मुलाखत घेण्यास नकार दिल्याचे सार्वजनिकरित्या स्पष्ट केले आहे.
'द मॉन्द'ची दक्षिण आशियातील प्रतिनिधी ज्युलिया बुवाशाँ यांनी केलेल्या एका ट्विटमुळे मोदींच्या मुलखातीला नकार दिल्याचे समोर आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.