लॅंडलाईनवरून बोला रोज १० तास फुकट

सध्याच्या मोबाईलच्या जगात लॅंडलाईन फोन कुठेतरी मागे पडले आहेत. मात्र लॅंडलाईन फोन्सला पुन्हा स्पर्धेत आणण्यासाठी बीएसएनएलने कंबर कसली आहे. १ मे पासून बीएसएनएलचे ग्राहक रात्री ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कुणालाही मोफत कॉल करू शकतात. 

Updated: Apr 15, 2015, 12:51 PM IST
लॅंडलाईनवरून बोला रोज १० तास फुकट title=

मुंबई : सध्याच्या मोबाईलच्या जगात लॅंडलाईन फोन कुठेतरी मागे पडले आहेत. मात्र लॅंडलाईन फोन्सला पुन्हा स्पर्धेत आणण्यासाठी बीएसएनएलने कंबर कसली आहे. १ मे पासून बीएसएनएलचे ग्राहक रात्री ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कुणालाही मोफत कॉल करू शकतात. 

बीएसएनएलचे धारक सध्या फक्त ब्रॉडबँड कनेक्शनचा वापर करतात. इंटरनेट न वापरणाऱ्या ग्राहकांनी लँडलाईन फोनचं कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली आहे. अशा ग्राहकांच्या पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी रात्री ९ ते सकाळी ७ या वेळेत मोफत फोन करु देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीतर्फे सांगण्यात येत आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.