नवी दिल्लीतील सोसायटीमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह

इंद्रप्रस्थ एक्स्टेन्शन येथील सह्याद्री सोसायटीतही गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातून कामानिमित्त दिल्लीत येऊन स्थायिक झालेल्या मराठीजणांनी 25 वर्षांपूर्वी ही सोसायटी स्थापन केली. या सोसायटीतील 70-80 कुटुंब एकत्र येऊन सर्व सण साजरे करतात. 

Updated: Sep 8, 2016, 11:56 AM IST
नवी दिल्लीतील सोसायटीमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह

नवी दिल्ली : इंद्रप्रस्थ एक्स्टेन्शन येथील सह्याद्री सोसायटीतही गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातून कामानिमित्त दिल्लीत येऊन स्थायिक झालेल्या मराठीजणांनी 25 वर्षांपूर्वी ही सोसायटी स्थापन केली. या सोसायटीतील 70-80 कुटुंब एकत्र येऊन सर्व सण साजरे करतात. 

या सोसायटीत गणेशोत्सवात तर मोठा उत्साह पाहायला मिळतोय. गणेशोत्सवात बासरी वादन, विविध सांस्कृतीक कार्यक्रम आणि नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बच्चेकंपनीनं एकाहून एक सरस नृत्य सादर करत उपस्थितांची मनं जिंकली. तर महिलांसाठी फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं.