www.24taas.com, झी मीडिया, पणजी
गोव्यात पर्रा इथे ओबोडो सायमन या नायजेरीयन पर्यटकाचा खून झाल्याने संतप्त झालेल्या नायजेरियन पर्यटकांनी धुमाकूळ घातला. यानंतर पोलिसांनी ५३ नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आलीय.
यावेळी शवविच्छेदनासाठी मृतदेह नेणाऱ्या एका शववाहिनीची मोडतोड करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावरही हैदोस घातला गेला. अत्यंत हिंस्त्र झालेल्या या नागरिकांसमोर गोवा पोलिसही हतबल झाले होते. अखेर पोलिसांनी डावपेच आखत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि एकेक नायजेरियला ताब्यात घेतलं. हा खून अंमली पदार्थांच्या व्यवहारातून झाल्याचं पोलिसांचं मत आहे.
‘पर्रा’ या भागात अनेक पर्यटक, विद्यार्थी यांचा वावर आहे. यातले अनेक जण बेकायदेशीररित्या गोव्यात राहतात. गोवा पोलिसांनी गेल्या महिन्याभरात चार कोटी रूपयांचं ड्रग्ज जप्त केले होते. या कारवाईत चार नायजेरियन लोकांना ताब्यात घेतलं होतं. त्यातूनच ओबोडो सायमनचा खून झाल्याचा संशय आहे.
गोव्यात बेकायदा वास्तव्याला असलेल्या आफ्रिकन नागरिकांविरोधात गोवा पोलिसांनी धडक मोहीम राबवली आहे. त्यांना त्यांच्या देशात परत हाकलून देण्यात येत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.