www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिवाळीच्या पहिल्या धनत्रयोदशी शुभ मुहूर्तावर सेंसेक्सची कामगिरी विक्रमीउच्चांकवर पोहोचली आहे. आतापर्यंतच्या उच्चांकावर सेंसेक्स पोहोचला आहे. सेंसेक्सने २१२३० टप्पा ओलांडला पार केला आहे.
२०१३मध्ये सेंसेक्समध्ये ९ टक्के वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०१२नंतर निफ्टी ६३०० वर पहिलांदा गेला आहे. सेंसेक्स याआधी २००८मध्ये सर्वोच्च स्थानावर होता. तब्बल पाच वर्ष महिन्यानंतर पहिल्यांदाच रेकॉर्ड तोडला.
परदेशी गुंतवणूक आणि आयटीमध्ये झालेली वृद्धि, धातू, बॅंकिंग आणि ऑटो क्षेत्रात वाढ झाल्याने सेंसेक्सची कामगिरी विक्रमीउच्चांकवर पोहोचली. त्यामुळे शेअर बाजारात मोठे खुशीचे वातावरण आहे.
मुंबई शेअर बाजार व एनएसई बाजार या दोन्हींची उलाढाल ५.३३ लाख कोटी रुपयांची आहे. भारतीय शेअर बाजारात होणारी ही सर्वाधिक उलाढाल आहे. गेल्या दिवसांपासून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला आहे.
गुरुवारी संध्याकाळी निर्देशांक २१, १६४.५२ वर बंद झाला होता. शुक्रवारी शेअर बाजार सुरु होताच निर्देशांकात ६६.१५ अंकांची वाढ होऊन बाजाराने २१,२३०.६७ वर झेप घेतली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.