मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर देणार राजीनामा

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर येत्या शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं समजतंय...

Updated: Nov 6, 2014, 08:24 PM IST
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर देणार राजीनामा title=

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर येत्या शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं समजतंय...

केंद्रातील मोदी सरकारमध्ये मनोहर पर्रीकरांचा केंद्रीय मंत्री म्हणून समावेश होणार असल्याचं कळतंय... त्यांच्या जागी गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून राजेंद्र आर्लेकर यांचं नाव आघाडीवर आहे.

आर्लेकर हे सध्या गोवा विधानसभेचे सभापती आहेत... येत्या शनिवारीच गोव्यातील नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान पंतप्रधानांकडून अशापद्धतीचं आमंत्रण आलं तर ते स्वीकारा आणि पुढील कारवाई करा असा पक्षाने आपल्याला आदेश दिल्याचं गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.