सोन्याच्या नाण्यांची खरेदी-विक्री बंद!

सोन्याची नाणी खरेदी करायचा तुमचा विचार असेल तर तुम्हाला थोडी वाट पहावी लागेल. कारण...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 11, 2013, 12:44 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सोन्याची नाणी खरेदी करायचा तुमचा विचार असेल तर तुम्हाला थोडी वाट पहावी लागेल. कारण सोन्याची नाणी आणि बारची विक्री सहा महिन्याच्या कालावधीसाठी थांबवण्याचा निर्णय देशभरातील सराफ व्यावसायसिकांनी घेतलाय.
सोने आयातीला पुन्हा चाप लावण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. परवान्याच्या मर्यादा कमी करण्याच्या हालचाली केंद्र सरकारनं सुरु केल्या आहेत. सोन्याची वाढती आयात आणि वाढती खरेदी यामुळे वाढणाऱ्या वित्तीय तुटीमुळे केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी आवश्यक असले तेव्हा आणि तेवढेच सोने खरेदी करण्याचे आवाहन केले होते. गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करुन नये, असं त्यांनी म्हटलं होतं.

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या याच आवाहनाला ज्वेलरी संघटनेनं प्रतिसाद देत सोन्याची नाण्यांची विक्री सहा महिन्यांच्या कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.