सोन्याच्या किंमती झाल्यात कमी, खरेदीदारांसाठी खुशखबर

सोन्याच्या किंमतीत बुधवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. बुधवारी सोन्याचे दर १६४ रुपयांनी कमी होऊन २४ हजार ८३० रुपयांवर बंद झाले. सकाळी सोन्याचे दर २५ हजार ०६५ होते. दिवसभरात सोन्याने २५ हजार १२७ रुपये इतका उच्चांकी स्तर गाठला तर २४ हजार ८१४ रुपये इतका नीचांकी स्तर गाठला. 

Updated: Dec 3, 2015, 10:05 AM IST
सोन्याच्या किंमती झाल्यात कमी, खरेदीदारांसाठी खुशखबर title=

नवी दिल्ली : सोन्याच्या किंमतीत बुधवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. बुधवारी सोन्याचे दर १६४ रुपयांनी कमी होऊन २४ हजार ८३० रुपयांवर बंद झाले. सकाळी सोन्याचे दर २५ हजार ०६५ होते. दिवसभरात सोन्याने २५ हजार १२७ रुपये इतका उच्चांकी स्तर गाठला तर २४ हजार ८१४ रुपये इतका नीचांकी स्तर गाठला. 

सोन्याच्या किंमतीत घसरण झाली असली तर चांदीच्या किंमतीत वाढ पाहायला मिळाली. चांदीच्या किंमतीत ६१ रुपयांची चांदीचा दर प्रति किलो ३३ हजार ३६० रुपयांवर बंद झाला. 

अमेरिकेच्या फेडरल बँकेकडून व्याजर वाढीचे संकेत तसेच घरगुती स्तरावर सोन्याच्या खरेदीतील घसरणीमुळे सोन्याच्या किंमतीत मोठ्या घसरणीची आशा व्यक्त केली जात आहे. 

सोन्याच्या कमी खरेदीमुळे यंदाच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केवळ १.७० अरब डॉलर सोन्याची आयात करण्यात आली. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ४.२ अरब डॉलर सोन्याची आयात करण्यात आली होती.

gold rate today in mumbai
22-Carat 24-Carat Change (%)
Current Price 24790 26513.37 -0.92%
Previous Price 25020 26759.36

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.