तिरूवनंतपुरूम : केरळचे मुख्यमंत्री ओमन चांडी यांच्या अडचणीत थांबण्याचे नाव घेत नाही आहे. सोलर पॅनल घोटाळ्यातील मुख्य आरोपीने प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्यायालयीन आयोगासमोर हजर झाला. त्याने चांडी समेत त्याच्या २ मंत्र्यांवर त्यांची पार्टनरचा सेक्सुअल फायदा घेतल्याचा आरोप लावला आहे.
आरोपी बीजू राधाकृष्णनने बुधवारी आयोगाला सांगितले की चांडी यांनी सरिता एस. नायर नावाच्या त्यांच्या सोलर बिझनेस पार्टनरचा 'सेक्सुअली' आरोप केला.
बीजूने आरोप लावला की चांडी यांच्याशिवाय मंत्री शिबू बेबी जॉन आणि ए. पी. अनिल कुमार आणि काँग्रेसचे इतर नेत्यांनी नायर यांचा वापर करून घेतला आहे. त्याने दावा केला आहे की त्याच्याकडे नायरने दिलेले पुरावे आहे. ते आयोगासमोर सादर करणार आहे.
इंग्रजी वृ्त्तपत्र इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार चांडी यांनी लाच म्हणून तीन टप्प्यात पाच कोटी रुपये घेतले आहे, असा आरोप बीजू यांनी केला आहे. दोन वर्षापूर्वी सोलर घोटाळा झाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
सत्ताधारी नेत्यांशी 'घनिष्ठ' संबंध ठेवणाऱ्या ३५ वर्षीय सरिता एस. नायर यांना अटक करण्यात आली, त्यानंतर एक डान्सर - अभिनेत्री शालू मेनन हिला अटक करण्यात आली होती. मुख्य आरोपी बीजू याला २००६ मध्ये आपल्या पत्नीच्या हत्येच्या आरोपात अटक करण्यात आले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.