सोन्याच्या दरात आणखी घट

नोटाबंदीनंतर सोन्याच्या दरात सतत घसरण होतेय. गेल्या तीन आठवड्यांत सोन्याच्या दरात 1900 रुपयांची घट झालीये. दुसरीकडे चांदीच्या किंमतीतही 3700 रुपयांची घट झालीये.

Updated: Dec 4, 2016, 01:20 PM IST
सोन्याच्या दरात आणखी घट title=

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर सोन्याच्या दरात सतत घसरण होतेय. गेल्या तीन आठवड्यांत सोन्याच्या दरात 1900 रुपयांची घट झालीये. दुसरीकडे चांदीच्या किंमतीतही 3700 रुपयांची घट झालीये.

दिल्लीमधील सराफा बाजारात सध्या सोन्याचे दर प्रतितोळा 29 हजार 250 रुपये आहे. दुसरीकडे इंडस्ट्रीयल आणि रिटेल मागणी घटल्याने चांदीचे दर 41 हजार प्रति किलोपर्यंत पोहोचलेत. 

नोटाबंदी जाहीर केल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 10 नोव्हेंबरला सोन्याचे दर 31 हजार 150 रुपये प्रति तोळा होते. ज्या दरात आता घट होत ते 29 हजार 250 रुपयांपर्यंत आलेत. चांदीच्या किंमतीतही मोठी घसरण झालीये.