नवी दिल्ली : सोन्याचा भाव दिवसेंदिवस कमी होत चाललाय. सतत बाराव्या दिवशी देखील सोन्याचा गेलेला दिसतोय.
शुक्रवारी सराफा बाजारात सोन्याचा भाव २२५ रुपयांनी घसरून २६,१३५ रुपये प्रति १० ग्रॅमवर आलेला दिसला. आत्ता हा दर भारतीय बाजारात २५,६७६ रुपये इतका आहे.
परदेशी बाजारातही सोन्याचा भाव कमी झालाय. यामागचं महत्त्वाचं कारण, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची घटत चाललेली मागणी असल्याचं सांगण्यात येतंय.
सोन्याबरोबर चांदीच्या भावातही घट झाली आहे. शुक्रवारी हा दर तब्बल ८०० रुपयांनी घसरून ३४,६०० रुपये प्रति किलोवर पोहचला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.