नवी दिल्ली : सोन्याच्या दरांत सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाल्याचं दिसून येतंय... शुक्रवारीही सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात घसरली.
मजबूत डॉलर आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या चांगल्या आकड्यांमुळे सोन्याचे दर घसरल्याचं सांगण्यात येतंय. गुरुवारी, जगभरातील अर्थव्यवस्थेबद्दल मिळालेल्या आशादायक बातम्यांमुळे सोन्याचे दर घसल्याचं दिसतंय.
गुंतवणुकदारांनी सोनं सोडून इतर गोष्टींमध्ये गुंतवणूक करणं सुरू केलंय. यामुळेच, सोन्याचे दर पडलेत.
सिंगापूरमध्ये स्पॉट गोल्ड शुक्रवारी ०.२ टक्क्यांनी घसरून १,२२९.९८ डॉलर प्रति औंस झालाय. तर सलग दोन आठवडे घसरल्यानंतर डॉलर चढलेला दिसला.
भारतात सोन्याचे दर आज एमसीएक्समध्ये आज सकाळी साडे दहा वाजता ३७६ रुपये प्रति दहा ग्रॅम पडले. त्यामुळे सोनं २७,१०५ रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहचलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.