जागतिक ट्रेंड: सोन्यात घट तर चांदी स्थिर

राजधानी दिल्लीच्या सराफ्यात शुक्रवारी सोन्याचा भाव १०० रुपयांनी घटून २८,२०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. औद्योगिक संस्था आणि नाणे निर्माते यांच्या मागणीत घट झाल्यानं चांदीचा भावही २५० रुपयांनी घटून ३८,३५० रुपये प्रतिकिलो राहिला.

PTI | Updated: Feb 8, 2015, 05:03 PM IST
जागतिक ट्रेंड: सोन्यात घट तर चांदी स्थिर  title=

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सराफ्यात शुक्रवारी सोन्याचा भाव १०० रुपयांनी घटून २८,२०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. औद्योगिक संस्था आणि नाणे निर्माते यांच्या मागणीत घट झाल्यानं चांदीचा भावही २५० रुपयांनी घटून ३८,३५० रुपये प्रतिकिलो राहिला.

लग्नसराईच्या तोंडावर आभूषण निर्माते आणि किरकोळ व्यापारी यांच्या मागणीत घट नोंदली आहे. जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सराफ्यात ही घट दिसून आली.

न्यूयॉर्क इथं सोन्याचा भाव ०.३५ टक्क्यांनी घटून १,२६४.५० डॉलर प्रतिऔंस व चांदी ०.६३ टक्क्यांनी घटून १७.२२ डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला.राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १०० रुपयांनी घसरून अनुक्रमे २८,२०० रुपये आणि २८,००० रुपये प्रति १० ग्रॅम राहिला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव मर्यादित व्यवहारामुळं २४,००० रुपयांवर स्थिर होता. तयार चांदीचा भाव २५० रुपयांनी घटून ३८,३५० रुपये, तर चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भावही ४२५ रुपयांनी कमी होऊन ३८,१४० रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीकरिता ६३,००० रुपये, तर विक्रीसाठी ६४,००० रुपये प्रतिशेकड्यावर कायम राहिला.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.