सोन्या-चांदीचे भाव आजही पडले

आंतरराष्ट्रीय पातळीवर घसरलेल्या मागणीमुळे दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचा भाव ३० रुपयांनी घसरला. २६,८७० रुपये प्रति दहा ग्रॅमवर आता हा भाव येऊन ठेपलाय. दागिने बनवणाऱ्या घरगुती बाजारातील मागणी घटल्यानं या बहुमूल्या धातूंवर दबाव दिसून आलाय. 

Updated: Dec 5, 2014, 07:56 PM IST
सोन्या-चांदीचे भाव आजही पडले title=

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर घसरलेल्या मागणीमुळे दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचा भाव ३० रुपयांनी घसरला. २६,८७० रुपये प्रति दहा ग्रॅमवर आता हा भाव येऊन ठेपलाय. दागिने बनवणाऱ्या घरगुती बाजारातील मागणी घटल्यानं या बहुमूल्या धातूंवर दबाव दिसून आलाय. 

औद्योगिक मागणी कमजोर पडल्यानं चांदीच्या भावत १०० रुपयांनी घसरण झालीय. ३६,९०० रुपये किलोवर चांदी येऊन दाखल झालीय. बाजार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किंमत घटल्यानं स्थानिक बाजारावरही याचा परिणाम दिसून आलाय. 

अमेरिकेत रोजगाराचे आकडे येण्यापूर्वी वैश्विक बाजारात सोनं कमजोर पडलेलं दिसलं. आकडे आल्यानंतर मात्र अमेरिकेत रोजगार संधी जास्त उपलब्ध झाल्याचं सांगण्यात येतंय. यामुळे, अर्थव्यवस्थेला हातभार लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जातेय. 

घरगुती बाजाराचा रोख ठरवणाऱ्या सिंगापूरमध्ये सोन्याचे भाव ०.३ टक्क्यांनी खाली घसरून १२०१.८१ डॉलर आणि चांदीचे भाव ०.२ टक्क्यांनी घसरून १६,४३ डॉलर प्रति औंस राहिलेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.