नवी दिल्ली : तुमच्याकडे कार किंवा बाइक आहे किंवा खरीदी करण्याचा विचार आहे तर ही बातमी नक्की वाचा. बातमी अशी आहे की विमा नियम बनवणारी इरडा (IRDA)हा विभाग या प्रस्तावावर विचार करते आहे की कारचा विमा एक वर्षा ऐवजी पांच वर्षाचां असावा. ऐवढच नाही तर याच्यासाठी पैसेही कमी मोजावे लागणार आहे.
सध्या दरवर्षी कारचा विमा करावा लागतो. दरवर्षी विमा करण्यासाठी एजंट लोकांचे फोन येत राहतात आणि अनेक मोह पाडणारी आश्वासने देतात. दरवर्षी लोकांना यासाठी बरीच कसरत करावी लागते. पण आता यापासून लवकरच सूटका होणार आहे. या बद्दल लवकरच सुचना दिल्या जाणार आहेत असं इरडाच्या एका अधिकारीने आर्थिक वृत्तपत्र 'द इकोनॉमिक टाइम्स'ला सांगितलं आहे.
इरडाच्या अधिकारी ने वृत्तपत्राला अशी माहीती दिली आहे की काही विमा कंपन्यानी या बाबतीत प्रस्ताव दिला आहे आणि आम्ही यावर विचार करतो आहे. आम्ही अगोदर टू-व्हीलरसाठी हे लागू करू याने जो अभिप्राय मिळेल त्या आधारवर कार आणि इतर वाहनांसाठीसुदधा ही व्यवस्था केली जाईल.असा प्रस्ताव करणाऱ्य़ा कंपन्याचं म्हणं आहे की बहुतेक लोकं गाडी खरीदी केल्यानतंर पुन्हा विमा नाही करत.त्यामुळे दीर्घकालीन विमा इंस्ट्रूमेंट ची गरज पडते.
या बाबतीत सगळय़ा कंपन्या आपल्या फायदा-नुकसानाचा विचार करते आहे आणि यानंतरच ते याला ग्रीन सिग्नल देतील. आता सगळयात मोठी अडचण नो-क्लेम बोनसच्या बाबतीत आहे. जी दरवर्षी त्या वाहन मालकांना दिली जाते ज्यांच्या गाडयांना कोणताही ऐक्सीडेंट मोबदला दिला नाही जातं.