नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बीएसएनएलने शुक्रवारी स्पष्ट केले की मोबाईल दरांत ८० टक्के सूट देणाऱ्या योजनेचा विस्तार केलाय. यामध्ये आधीच्या ग्राहकांनाही याचा लाभ मिळणार आहे. आज म्हणजे १६ जानेवारीपासून ही योजना लागू करण्यात आली आहे.
बीएसएनने आधी केवळ नवीन ग्राहकांसाठी ही योजना असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता या योजनेत बदल करण्यात आलाय. प्रीपेड मोबाईल ग्राहकांचे कॉलदर ८० टक्क्यांनी घटविण्यात आले आहेत. आता आधीच्या प्रीपेड ग्राहकांनाही यात सहभागी करुन घेतले आहे.
कंपनी कॉल रेट प्रति मिनीट आणि प्रति सेकंद दोन्ही बिलिंग प्लानसाठी घटविण्यात आले आहेत. आता मार्केटमध्ये सर्वात कमी दर हा BSNLचा असून दोन नवीन दर व्हाउचर सुरू केली आहेत, अशी माहिती BSNLमंडळाचे निदेशक (उपभोक्ता मोबिलिटी) आर. के. मित्तल यांनी दिली.