प्रजासत्ताकदिनानिमित्त 'गुगल डुडल'चा चित्ररथ

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने गुगलने एका खास डूडल, गुगलच्या होमपेजवर देऊन भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलने डुडलच्या माध्यमातून एक चित्ररथ तयार केला आहे.

Updated: Jan 26, 2015, 04:06 PM IST
प्रजासत्ताकदिनानिमित्त 'गुगल डुडल'चा चित्ररथ title=

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने गुगलने एका खास डूडल, गुगलच्या होमपेजवर देऊन भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलने डुडलच्या माध्यमातून एक चित्ररथ तयार केला आहे.

भारताच्या विविधतेतील एकता मांडण्याचा प्रयत्न केला असून यात इंडिया गेट, राष्ट्रपती भवन अशा महत्त्वाच्या वास्तूंचे दर्शन घडविले आहे. तसेच पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले स्त्री-पुरूष या डूडलमध्ये दाखविण्यात आले आहेत. 

भारतातील विविध राज्यांतील पारंपारिक विविधतेचे दर्शन तेथील नागरिकांच्या पोशाखांतील विविधतेतून घडविण्याचा प्रयत्न हा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.