www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामधील आयएएस महिला अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांनी वाळू माफियांचा बिमोड करण्यास सुरूवात करताच त्यांना राजकीय फटका बसला. त्यांना तात्काळ निलंबित केले. हे निलंबन योग्य असल्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हटले आहे. नागपाल यांचे निलंबन करण्यामागे समाजवादी पक्षाचा हात असल्याचे पुढे आलेय. तसा दावाही एका नेत्याने केलाय.
उत्तर प्रदेशमील गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील आयएएस अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांच्या निलंबनाबाबत समाजवादी पार्टीच्या नेत्यांने खबळजनक खुलासा केला. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना सांगितले आणि त्यांचे ४१ व्या मिनिटांत निलंबन झाल्याचे पक्षाचे नेते नरेंद्र भाटी यांनी म्हटलेय. मुख्यमंत्र्यांनी मी चर्चा केली. मीच त्यांचे निलंबन करून घेतले, असेही ते म्हणालेत.
एका जाहीर सभेत भाटी यांनी सांगितले की, मुख्यमंत्री अखिलेश यांच्याशी १०.३० वाजता बोललो. मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर ११.११ वाजता निलंबित करण्याची ऑडर निघाली. ही ऑडर जिल्ह्याधिकाऱ्यांकडे पोहोचताच त्यांना निलंबित करण्यात आले. ही लोकशाहीची ताकद आहे. हेच मी सांगण्यासाठी मी येथे आलो. ज्या बाईने असभ्यता दाखविली तिची जागा तिला ४० मिनिटात भोगावी लागली आहे, असा अजब दावा भाटी यांनी केला.
बेकायदेशीर उभारण्यात आलेली मजिद पाडण्याचे आदेश दिल्यानंतर नागपाल यांना वादग्रस्त ठरविले गेलेय. या मजिदचे भूमी भूजन नरेंद्र भाटी यांनी केले आहे. मात्र, असे आपण काही केलेले नाही, अशी पलटी मारून लोकांच्या सहकार्यासाठी ५१ रूपयांची मदत केली असे ते म्हणालेत. नरेंद्र भाटी उत्तर प्रदेश स्टेट एग्रो कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आहेत. त्यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा आहे. दुर्गा यांच्या निलंबनानंतर अखिलेश यादव यांना अनेक विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.