नवी दिल्ली : सरकारने बँकाचं विलीनीकरणाचा घेतलेल्या निर्णयाविरोधात आज सरकारी बँक कर्मचा-यांनी एक दिवसीय संप पुकारलाय.
या संपात 9 बँकांचे अधिकारी आणि 8 लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत. या संपामुळे बँकाच्या व्यवहारावर परिणाम होणार आहे.
चेक क्लीअरन्स, पैसे भरणे, पैसे काढणे यासारख्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होईल. युनाईटेड फोरम ऑफ बँक्स युनियन या शिखर संघटनेच्या नेतृत्वाखाली हा संप पुकारलाय.