सरकार आता प्लास्टिक नोटा आणण्याच्या तयारीत

नोटाबंदीनंतर सरकारने आता प्लास्टिक नोटा छापण्याच्या निर्णय घेतला आहे. प्लास्टिक नोटा बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली आहे.

Updated: Dec 9, 2016, 06:45 PM IST
सरकार आता प्लास्टिक नोटा आणण्याच्या तयारीत title=

नवी दिल्ली: नोटाबंदीनंतर सरकारने आता प्लास्टिक नोटा छापण्याच्या निर्णय घेतला आहे. प्लास्टिक नोटा बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली आहे.

बऱ्याच कालावधीनंतर प्लास्टिक नोटा चलनात आणण्याचा रिझर्व्ह बँकेचा विचार आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये चाचणी स्वरूपात भौगोलिक रचनेनुसार निवडक पाच शहरांमध्ये १०- १० रूपयांच्या १ अब्ज प्लास्टिक नोटा चलनात आणण्यात येणार असल्याची माहिती संसदेत देण्यात आली होती. यासाठी कोची, म्हैसूर, जयपूर, शिमला आणि भुवनेश्वर या पाच शहरांचा समावेश आहे.

यापूर्वी कोणत्या देशाने आणल्या प्लास्टिक नोटा...

प्लास्टिक नोटा पाच वर्षापर्यंत सुरक्षित राहतात. तसेच प्लास्टिकच्या बनावट नोटा बनवणे कठीण आहे. त्याशिवाय कागदी नोटांच्या तुलनेत त्या अधिक चांगल्या दिसतात. ऑस्ट्रिलिया देशाने सर्वात आधी बनावट नोटांच्या उद्योगाला चाप बसवण्यासाठी प्लास्टिक नोटा चलनात आणल्या होत्या.