नवी दिल्ली : केंद्र सरकारने धूम्रपानविरोधी कायदा अधिक कडक करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचं निर्णय घेतलाय.
खुल्या सिगारेट विक्रीवर बंदी तर येणारच आहे, शिवाय सार्वजनिक ठिकाणी सिगारेटचा दम मारणाऱ्याला आता 200 नाही तर 1000 हजार रूपयांचा दंड होणार आहे.
आरोग्य मंत्रालयाने ही शिफारस सुधारीत प्रस्तावात केली आहे. धुम्रपानावर कठोर प्रतिबंध लादतांना हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील स्मोकिंग झोनही काढून टाकण्याची शिफारस सरकारने केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी दिली आहे.
तंबाखूजन्य पदार्थांसाठीचं वय 18 वरून 21 करण्यात येणार आहे, यावर जनतेची मतं देखिल मागवण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.