नवी दिल्ली : केंद्र सरकारने गेल्या वर्षात ५०,००० कोटी रुपयांची अप्रत्यक्ष कर चोरी पकडली आहे. त्यासाशिवाय २१,००० कोटी रुपयांचे अघोषित आयकरची माहिती मिळवली आहे.
वित्त मंत्रालयाने आज याबाबत माहिती दिली. काळा पैसा कारवाई करताना दोन वर्षांत ३,९६३ कोटी रुपयांच्या तस्करीचे साहित्य जप्त करण्यात आले. मागील दोन वर्षांच्या कालावधीत ३२ पेक्षा अधिक टक्के आहे.
यात सरकारने देश आणि देशाबाहेरील काळापैशावर अंकुश ठेवण्यासाठी उपाय योजना केल्यामुळे तसेच काळापैशा कायदा लागू करण्याबाबत उचलण्यात आलेल्या उपाय-योजनांचा परिणाम आहे.