नवी दिल्ली : श्रीमंत गाटातील व्यक्तींसाठी स्वयंपाकाच्या गॅसचे अनुदान बंद करण्याचा सरकारचा विचार असल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संगितलंय.
HT लीडरशिप समीटमध्ये त्यांनी सांगितलं की, श्रीमंत लोकांना स्वयंपाकाच्या गॅसवर अनुदान देणं बंद करणं हा यापुढील महत्त्वाचा निर्णय असेल.
लवकरच हा निर्णय घेतला जाईल. अर्थमंत्र्यांच्या या निर्णयावर विरोधकांनीमात्र चांगलंच तोंडसूख घेतलंय. जेटली यांच्या या निर्णयामुळे महागाईत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.