नवी दिल्ली : 15 हजार आणि त्याहून कमी पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना भारत सरकारनं खुशखबरी दिलीय.
नुकतीच कर्मचारी भविष्य निधी संघटनेची एक कार्यशाळा पार पडली. यामध्ये एम्पलॉय एनरोलमेंट कॅम्पेन आणि पंतप्रधान रोजगार प्रोत्सहन योजनेविषयी माहिती देण्यात आली.
यावेळी, 15 हजार रुपयांहून कमी पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ईपीएफमध्ये जमा होणारा 8.33 टक्के पैसे भारत सरकार तीन वर्षांपर्यंत देणार असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, या कर्मचाऱ्यांचं ईपीएफओमध्ये पहिल्यापासून रजिस्ट्रेशन असता कामा नये.
यामुळे, रोजगार देणाऱ्या नियोक्त्याला (employer) फायदा मिळेल. या योजनेचा फायदा 31 मार्चपर्यंत घेतला जाऊ शकतो. या योजनेंतर्गत, नियुक्ते आपल्या केवळ 20 नवे कर्मचाऱ्यांसाठी अर्ज करू शकतात.
एप्रिल 2009 नंतर आपल्या कर्मचाऱ्यांचा पीएफ जर एखाद्या नियुक्त्यानं जमा केला नसेल तर एम्प्लॉई एनरोलमेंट एमनेस्टी स्कीम अंतर्गत या योजनेचा लाभ घेऊ शकतात.