अहमदाबाद : गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊ केला आहे. आनंदीबेन पटेल यांनी भाजप नेतृत्त्वाला सांगितले की, नोव्हेंबरमध्ये त्या ७५ वर्षांच्या होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी दोन महिने अगोदरच मला जबाबदारीतून मुक्त करावे.
फेसबूक पोस्टद्वारे त्यांनी आपले हे मत मांडल्याचे वृत्त मीडियामध्ये आले आहे.
गेल्या काही दिवसापासून भाजपमध्ये सहमती झाली आहे की ७५ वर्षांवर वय झाले तर त्यांनी इतर नेत्यांना पुढे येण्यासाठी संधी द्यावी.
आनंदीबेन म्हणाल्या की, गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहे. जानेवारी महिन्यात वाइब्रेंट गुजरातचा कार्यक्रमाचे आयोजन करायचे आहे. त्यामुळे योग्यवेळी गुजरातचे मुख्यमंत्री सोडले पाहिजे.