www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
राजकारणी लोक एखादं वक्तव्य करण्याआधी अगोदर विचार करतात का? असा प्रश्न निर्माण व्हावा, असं वक्तव्य गुजरातच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी केलंय... एका शाळेच्या कार्यक्रमात त्यांनी मुलांना चक्क `रिजेक्टेड माल` असं संबोधलंय.
आनंदीबेन गुरुवारी एका शाळेच्या कार्यक्रमा निमित्तानं उपस्थित राहिल्या होत्या. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हे धक्कादायक विधान केलंय.
`इथल्या अनेक मुलींशी संवाद साधता आला... तुम्हाला कधी वाटलंय की मुली मागे आहेत? मुली खूप पुढे गेल्यात... आता येणाऱ्या पाच-सात वर्षांत जरी मुलींची संख्या कमी झाली तरी त्यांना मुलं निवडताना त्रास होणार नाही... मुलगा शिकला नाही म्हणून ती त्याला नाकारु शकते`, असं म्हणत त्यांनी मुलींच्या शिक्षणावर जोर दिला.
पण, आनंदीबेन एव्हढंच बोलून थांबल्या नाहीत... तर, `आता मुली स्वतःपेक्षा जास्त शिकलेल्या मुलाला पसंत करतात... जेव्हा मुली शिकून मोठया होतील त्यावेळी त्या कमी शिकलेल्या गाढवाला पसंत करणार नाहीत... त्यात मुलींची संख्या मुलांच्या मानानं कमी आहे... अशा वेळी त्या `रिजेक्टेड माला`ला पण पसंत करणार नाहीत...` असं पुश्तीही त्यांनी पुढे जोडली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.