व्यापाऱ्याकडून 2000-500 च्या नव्या नोटांचं घबाड जप्त

आसाम पोलिसांनी एका व्यापाऱ्याच्या घरात मारलेल्या छाप्यानंतर 2000 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटांचं घबाड जप्त करण्यात आलंय. 

Updated: Dec 13, 2016, 09:51 AM IST
व्यापाऱ्याकडून 2000-500 च्या नव्या नोटांचं घबाड जप्त title=

गुवाहाटी : आसाम पोलिसांनी एका व्यापाऱ्याच्या घरात मारलेल्या छाप्यानंतर 2000 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटांचं घबाड जप्त करण्यात आलंय. 

गुप्त सूचना मिळाल्यानंतर सीआयडीच्या टीमनं हार्दी सिंग बेदी या व्यापाऱ्याच्या घरावर छापा मारला होता. त्यानंतर, एक करोड 55 लाख रुपयांचं घबाड पोलिसांनी जप्त केलंय... ही रक्कम पाहिल्यानंतर पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. 

हार्दी सिंग बेदीचं एक हॉटेल आणि बार आहे. शहरातल्या बेलटोलामध्ये त्याच्या घरावर मारलेल्या छाप्यादरम्यान पोलिसांनी नव्या नोटांमध्ये 1 करोड 54 लाख 81 हजार रुपये जप्त केले. नोटाबंदीनंतर छापल्या गेलेल्या या नोटा आहेत. 

पोलिसांनी या प्रकरणाची पुढची सूत्र आयकर विभागाकडे सोपवली आहेत.