बंगळूरु : काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने तिरुपती येथील हुंडीमध्ये स्वत:च्या डाव्या हाताचे एक बोट कापून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जामीन मिळाला तर आपण बोट कापून देऊ असं त्याने म्हटलं होतं, म्हणून त्याने बोट कारून दिलं.
२५ डिसेंबरला सुरेशने तिरुपती येथून जाऊन स्वत:च्या डाव्या हाताचे एक बोट कापून हुंडीमध्ये टाकले. इंदूवालू सुरेश असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. तो बंगळुरुपासून ६० कि.मी. अंतरावर असलेल्या रामानगर येथे तो रहातो.
बोट कापणार असल्याची आपण आपल्या कुटुंबाला आगाऊ माहिती दिली नव्हती. मी मित्रासोबत थेट तिरुपतीला निघून गेलो असे सुरेशने सांगितले.
मी हजार रुपयाच्या नोटेमध्ये बोट गुंडाळले आणि सोबत आभाराची चिठ्ठी हुंडीमध्ये टाकली अशी माहिती सुरेशने दिली.
मी बोट कापले त्यावेळी मला वेदना झाल्या नाहीत. मी नंतर मंदिराजवळच्या रुग्णालयात गेले आणि तिथे उपचार केले. माझ्या गाडीचा एसी कॉम्र्पेसर रिपेअर करत असताना मी बोट गमावल्याचे डॉक्टरांना सांगितले. इंदूवालू सुरेश पेशाने ग्रॅनाईटचा व्यावसायिक आहे.
सोनिया गांधी आणि राहुल गांधींना न्यायालयाने हजर होण्यासाठी समन्स बजावले तेव्हा संपूर्ण काँग्रेस पक्ष चिंतेत होता. त्यावेळी मी तिरुपतीला माझ्या नेत्यांना जामीन मंजूर झाला तर, मी डाव्या हाताचा अंगठा देईन असा नवस बोललो होतो असे सुरेशने सांगितले.