मृतदेहावर लिहलं, 'माझ्या बहिणीचा याने बलात्कार केला होता'

देहरादूनच्या एका विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मृतदेहाच्या बाजूला रक्ताने लिहलं आहे, 'याने माझ्या बहिणाचा बलात्कार केला होता'.

Updated: Sep 7, 2015, 08:55 PM IST
मृतदेहावर लिहलं,  'माझ्या बहिणीचा याने बलात्कार केला होता' title=

देहरादून : देहरादूनच्या एका विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मृतदेहाच्या बाजूला रक्ताने लिहलं आहे, 'याने माझ्या बहिणाचा बलात्कार केला होता'.

देहरादूनमध्ये भाड्याच्या घरात राहणारा नीरज हा उत्तर प्रदेशचा रहिवासी होता, घरमालक कामानिमित्ताने बाहेर गेले होते, अशा वेळी नीरजची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली, त्याचे डोळे देखील फोडण्यात आल्याचं दिसत होतं.
 
नीरजची हत्या एखाद्या जवळच्या व्यक्तीने केली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस आरोपीची शोध घेत आहेत, नीरज याचा एखाद्या बलात्काराशी संबंध आहे का, याचा देखील शोध घेतला जात आहे. पण अजून कोणताही धागादोरा हाती आलेला नाही. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.