नवी दिल्ली : तेलंगणामध्ये उष्माघातानं आणखी १०० जणांचा बळी घेतला असून देशात उष्मा घातानं घेतलेल्या बळींची संख्या अठराशेच्यावर गेली आहे.
जागतिक तापमानात वाढ झाल्यामुळे उष्णतेची ही लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आणखी काही दिवस तरी या चढत्या भाजणीतून सुटका होण्याची चिन्हे नाहीत.
दरम्यान आंध्रा आणि तेलंगणामध्ये मृतांची संख्या सर्वाधीक आहे. उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढल्याने केंद्र सरकारने सर्व राज्यांना दक्षता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. रुग्णालयांमध्ये अतिरिक्त वैद्यकीय सेवा पुरवण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना दिले आहेत.
डोकेदुखी, चक्कर येणे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे आदी तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले असून अशा प्रकारच्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.