चेन्नई : उत्तर भारतात उष्णतेची लाट पसरलीय. वाढत्या उन्हामुळे आत्तापर्यंत तब्बल १११ जणांनी आपले प्राण गमावलेत.
यातील, आंध्रप्रदेशात ४५ तर तेलंगणामध्ये आत्तापर्यंत ६६ जण उष्माघाताचे बळी ठरलेत. उत्तर प्रदेश सरकारनं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा सरकारनं लोकांना दुपारी १२ ते ३ वाजल्यादरम्यान उन्हात बाहेर पडण्याचं टाळण्याचा सल्ला दिलाय.
बुधवारी हैदराबादमध्ये कमाल ४३ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद करण्यात आली. १७ एप्रिलपर्यंत परिस्थिती अशीच राहण्याची चिन्हं आहेत.