उज्जैन: उज्जैनमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यामध्ये पावसान हजेरी लावली आहे. पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा सुटल्यानं कुंभमेळ्यामधील एक मंडप कोसळला. या दुर्घटनेमध्ये 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये 4 भक्त आणि एक साधू असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर या अपघातामध्ये 70 जणं जखमी झाले आहेत.
या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना जवळच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या मंडपाच्या खाली दोन गाड्या अडकल्याची प्राथमिक माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. पावसाचं पाणी मंडपामध्ये घुसल्यामुळे भाविकांचीही पळापळ झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी या अपघातानंतर शोक व्यक्त केला आहे. तसंच मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Pictures of pandal that collapsed due to strong winds & rainfall in #SimhasthKumbh2016 (Ujjain) claiming 5 lives pic.twitter.com/gPVob5Yu14
— ANI (@ANI_news) 5 May 2016
Pictures of pandal that fell down due to strong winds & rainfall in #SimhasthKumbh2016 (Ujjain) claiming 5 lives pic.twitter.com/aMwvd0MAe9
— ANI (@ANI_news) 5 May 2016