नथूरामसाठी हिंदू महासभा साजरा करणार 'बलिदान दिन'

महात्मा गांधींच्या हत्येचा आरोपी नथुराम गोडसे याला ज्या दिवशी फाशी देण्यात आली होती, तो दिवस बलिदान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय हिंदू महासभेने घेतला आहे.

Updated: Oct 19, 2015, 01:21 PM IST
नथूरामसाठी हिंदू महासभा साजरा करणार 'बलिदान दिन' title=

नवी दिल्ली : महात्मा गांधींच्या हत्येचा आरोपी नथुराम गोडसे याला ज्या दिवशी फाशी देण्यात आली होती, तो दिवस बलिदान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय हिंदू महासभेने घेतला आहे.

हिंदू महासभेने मागील वर्षी नथुराम गोडसे याच्या आठवणीत मंदिर बनवण्याची घोषणा केली होती, यानंतर आता नथुरामला फाशी दिली तो दिवस बलिदान दिन साजरा करण्याचा निर्णय हिंदू महासभेने घेतला आहे.

नथुराम गोडसेला अंबाला जेलमध्ये १५ नोव्हेंबर १९४९ रोजी फाशी देण्यात आली होती. हिंदू महासभा नाथुराम गोडसेचा भाऊ गोपाल गोडसे लिखित पुस्तक गांधी वध का? याचं संक्षिप्त स्वरूप वितरीत करण्याचाही विचार करत आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.